प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील जि.प.सदस्या सौ.नंदाताई डोफेकर यांच्या मार्गदर्शनात महिलांनी परिसराची साफसफाई करुन संत गाडगेबाबांना अभिवादन करुन जयंती साजरी केली. शाळेचे दार न पाहलेले संत गाडगे महाराज हे चालतेबोलते विद्यापिठ होते.त्यांनी आपल्या प्रबोधनपर किर्तनातुन लोकांच्या मनातली घाण तर दुर केलीच परंतु परिसरातही साफसफाई करुन लोकांना स्वच्छतेविषयी महत्व आपल्या कार्यातुन गाडगेबाबा लोकांना पटवुन द्यायचे.
