प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर शहरात संत गाडगेबाबा शोध बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीर यांच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्त विविध ठीकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सर्व प्रथम संत गाडगेबाबा विद्यापीठ मंगरुळपीर व महात्मा फुले उद्यान मंगरूळपीर व गाडगेबाबा मंदिराजवळचे परिसर स्वच्छ करून व संत गाडगेबाबा मंदीर कारंजा रोड येथे जयंती साजरी केली.व त्यानंतर नगरपरिषद मध्ये पुष्पहार पुजन करुन अशाप्रकारे संत गाडगेबाबा यांची जयंती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साजरी करण्यात आली.
