बंजारा मात्रूभाषेचे स्वाभिमान जपून ठेवणे गरजेचे ; ‘जागतिक गोरबोली दन’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-गोर सेना , गोर सिकवाडीच्या वतीने नुकताच “जागतीक गोर बोली दन” साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमोद चव्हान ( संगीत गायक) यांनी सतगरु सेवालाल यांच्या जिवनचरित्रावर संगीतमय गायन करुन उपस्थितांना प्रोत्साहित केले. गोर बोली जतन करण्यासाठी समाजातील प्रत्येक सदस्याने सदैव तत्पर राहावे व मायबोलीचा स्वाभिमान जपावा व ती टिकुन राहावी म्हणून सदैव प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. जयकुमार चव्हान यांनी बंजारा समाजाचा पूर्वकालीन इतिहास, लोक गीत, जिवन जगण्याची संस्कृती, चाली रिती विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा.सुधाकर पवार यांनी गोरसिकवाडीच्या विचारधारेवर प्रकाश टाकुन समाजाला कशी दिशा द्यावी व आज समाजातील तरुण मुला मुलींचे विवीध प्रश्नांचा ऊलगडा केला.

.प्रा. ऊल्हास चव्हाण यांनी सतगरु सेवालाल महाराज यांचे अपुर्ण राहिलेले कार्य पुर्ण कसे करावे याविषयी मार्गदर्शन करुन समाजाला अज्ञानातुन ज्ञानाकडे नेणारे शिक्षण हे एकमेव मार्ग आहे म्हणून आपन आपल्या मुला—मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्नशिल राहावे अशी स्पष्ट भुमीका कार्यक्रमादरम्यान मांडली. रायसिना स्टडी सेन्टर अमरावती विभागाचे सहसंयोजक रविद्र राठोड यांनी गोर सिकवाडीचे नायक काशीनाथ खोला यांचे महान विचार समाजाला न्याय देऊ शकतात असे सुतोवाच केले.

“जागतीक गोर बोली दिन” हि संकल्पना आपल्या मनात घेऊन ती समाजापर्यन्त पोहचविण्याचे मोलाचे कार्य प्रत्येक समाज बांधवांनी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.गोर सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष प्रकाश एस. राठोड यांनी वडीलधारी मंडळीनी आपल्या जवळ असलेला बंजारा समाजाचा इतीहास,लेंगी,भजन,साकी, साक्तर,झंबरका इ. गोर साहीत्याचे लिखाण करुन तो तरुण मुला-मुली पर्यन्त पोहचवावा अशी विनंती बंजारा समाज बाधंवाना केली.

गोर सेनेचे जिल्हा संघटक सुनिल जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.”जागतीक गोर बोली दिन” साजरा करण्यासाठी गोर सिकवाडीचे विभागीय हसाबी संतोष आडे,शेषराव चव्हान गोर सेना तालुकाध्यक्ष कारंजा तसेच गोर सेनेचे सर्व पदाधिकारी आशिष राठोड जिल्हा उपाध्यक्ष,गोपाल चव्हाण मानोरा, माही राठोड प्रसिद्धि प्रमुख अमरावती विभाग,उत्तम पवार साहित्य दळ प्रमुख मानोरा, घनशाम राठोड संयोजक मंगरुळपीर, गोकुळ आडे, हे सुध्दा हजर होते या सगळ्यानी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!