पुणे वार्ता :- पुणे जिल्हा परिषद सदस्या तनुजा संदिप घनवट यांच्या वयक्तिक फंडातुन गारगोटवाडी जिल्हा परिषद शाळा स्टेज बांधकाम ,व सुशोभीकरण साठी 5 लाख रूपये निधी तर बहुउद्देशीय कार्यालय साठी 5 लाख रूपये निधी मंजुर करून दिला.

त्याचे ग्रामस्थांनी मनापासून अभिनंदन केले आहे. या कामाचे भुमिपुजन तनुजा घनवट गारगोटवाडी गावच्या आदर्श लोकनियुक्त सरपंच, वर्षा बच्चे उपसरपंच, व मायाताई कंद पाटील ,यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपसरपंच रोहिणी काळोखे पाटील, उपसरपंच राहुल गारगोटे ,माजी सरपंच वैशाली काळोखे ,गारगोटवाडी गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य ,जनकल्याण प्रतिष्ठाण अध्यक्ष मनोहर बच्चे, उपाध्यक्ष दादाभाऊ गारगोटे ,पोलिस पाटील नवनाथ काळोखे पाटील, दत्ताभाऊ गारगोटे माजी सरपंच, गोविंद गारगोटे ,रघुनाथ गारगोटे मा तंटामुक्ती अध्यक्ष ,नामदेव गारगोटे, ह भ प शंकर महाराज गारगोटे, कर्मचारी कोडिभाऊ गारगोटे ,किसन गारगोटे ,सामाजिक कार्यकर्ते व मानवाधिकार मिडिया फाऊंडेशन मानवाधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ कंद पाटील ,तसेच गारगोटवाडी गावातील महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
