महीला किसान दिवस.,Date :-२२ oct
प्रतिनिधी विवेक मोरे :-

नांदगाव खंडेश्वर:- तालुका अंतर्गत धानोरा गुरव येथे महिला किसान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी माविम व उमेद अंतर्गत स्थापित गटांच्या पदाधिकारी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मा. कृषि मंत्री दादाजी भुसे यांचा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.

यशस्वी बचत गटाच्या महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. व महिलांना pmfme, smart, etc योजनांची माहिती देण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे , प्रणव ठाकरे मंडळ कृषि अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा डफळे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले तसेच उदय गावंडे कृषि पर्यवेक्षक, दीपक इंगोले सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक , कृषी सहाय्यक आकाश दाभाडे ,पी.यू. लाडके, व. ईतर कृषि सहायक उपस्थित होते.
