प्रतिनिधी ओम मोरे
अमरावती- विवाहित प्रेमयुगुलाने धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या केली.ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी १० वाजता अकोला मार्गावरील अचलपूर तालुक्यातील येणी पांढरी येथिल एका शेतशिवारात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी परतवाडा येथिल पोलीस पोहचले असून फाॅरेन्सिक टिमला पाचारण करण्यात आले आहे.सुधीर रामदास बोबडे (वय४८) वनश्री काॅलनी कांडली व अलका मनोज दोडके (वय४८) रामनगर कांडली अशी चाकूने वार करीत आत्महत्या करण्याऱ्या विवाहित प्रेमी युगुलांची नावे आहेत.
