विस्तार आधिकारी यांची जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मरकळ येथे सखोल भेट

प्रतिनिधी सुनील बटवाल

चिंबळी दि २३( ‌‌‌वार्ताहर ) चाकण बीटच्या विस्तार आधिकारी मा.सौ.अलका जाधव मॅडम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मरकळ येथे सखोल भेट देऊन शाळेतील इयत्ता पाचवी च्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीची माहिती घेतली,तसेच पुणे जिल्हा परिषद ने सुरू केलेला शैक्षणिक गुणवत्ता विकास दहा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी शाळेत कशा पद्धतीने सुरू आहे या विषयी शाळेतील शिक्षक विनोद चव्हाण यांनी विस्तृत माहिती देऊन या सर्व शालेय उपक्रमांची दखल वर्तमान पत्रांत देखील घेतली जाते.

याची कल्पना दिली तद्नंतर मॅडम ने इतर वर्गातील मुलांचे कविता पाठांतर,वाचन लेखन याची देखील पाहणी करून विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले,तद्नंतर शाळेत सुरू असलेल्या C.S.R फंडातून शौचालय बांकामाची व जिल्हा परिषद निधीतून निर्माण केलेल्या सभागृहाची पाहणी केली शाळेत सौरउर्जा निर्मिती प्रकल्प लवकरच सुरू होईल याचीही माहिती घेतली शाळेत रोटरी क्लब द्वारे शालेय मैदानात ब्लाॅक बसविणे, तसेच संपूर्ण शालेय ईमारतीस केलेले रंगकाम,शाळेस ग्रंथालय अनुदानातून केलेले फर्नीचर,पुस्तके,ग्रंथ साहित्य याची देखील पाहणी करून एकंदरित शालेय कामकाजाचे कौतुक करून सर्व शिक्षकांना विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सूचना व मार्गदर्शन केले .

तद्नंतर केंद्रप्रमुख नामदेव गायकवाड व मुख्याध्यापिका सुरेखा सिरसठ व अलका ओव्हाळ यांनी विस्तार आधिकारी सौ.अलका जाधव मॅडम यांना केंद्रप्रमुख नामदेव गायकवाड सर यांचे स्वरचित लिखीत आनंदी जीवनाच्या छटा हे पुस्तक व शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले या वेळी अचानकपणे उपस्थित असणारे दैनिक प्रभातचे वरीष्ठ पत्रकार मा.सुनिल बटवाल साहेब यांचा देखील शाळेच्या वतीने सन्मान करून आपण शाळेतील सुरू असलेल्या उपक्रमांची प्रसिद्धी वर्तमान पत्रातून देत असल्यानेच मरकळ शाळेच्या पटसंखेत वाढ होत असून आम्हा शिक्षकांवर देखील विद्यार्थींना जास्तीत जास्त गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी वाढत असल्याची भावना शाळेने व्यक्त केली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!