प्रकरणाची पोलीस अधीक्षंकाकडे तक्रार पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने तातडीने बदली ? पोलीस मुख्यालयात दाखल
दर्यापुर – महेश बुंदे
दर्यापुर तालुक्यातील येवदा सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या ठाणेदार अमोल बच्छाव यांनी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आणि बांधकाम विभागात अंभियता पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला प्रेमजाळ्यात अडकवून तिला गायब केले असल्याची तसेच सदर अंभियत्यावर भाडोत्री गुंड पाठवून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची खळबळजनक तक्रार अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचेकडे करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी दर्यापुर उपविभागीय पोलीस अधिकारी करणार आहेत. या संबंधात पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तातडीने कारवाई करत अमुल बच्छाव यांना येवदा येथून हटवून मुख्यालयात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.
सदर महिलेच्या पती, सासरे व भाऊ यांनी दर्यापूर येथे पत्रकार परिषद आयोजित करत वरील माहिती देत ठाणेदार अमुल बच्छाव यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमुल बच्छाव येवदा येथे रूजू होण्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कार्यरत होते. त्यांच्या घराशेजारीच अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील बांधकाम विभागात अंभियता पदावर नोकरी करणारे पती पत्नी आपल्या लहान मुलासह वास्तव्यास होते. ठाणेदार साहेब सुद्धा विवाहित होते मात्र शेजारी असल्याने परिचय वाढला आणी ठाणेदारानी अंभियत्याच्या पत्नीला प्रेमाच्या नादी लावले. मला माझे पत्नी पासून मुलबाळ होत नसल्याने मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगुन तिला आपल्या पती पासून घटस्फ़ोट घ्यायला लावला. असा आरोप महिलेचे पती दिव्यकुमार रमेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिव्य कुमार शर्मा त्यांचे वडील रमेश शर्मा, व बंधू राहुल शर्मा उपस्थित होते. या संबंधातील तक्रार ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल केल्यानंतर सदर प्रकरण दर्यापूर उपविभागीय अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्याकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आले होते या संबंधातील चौकशी करीता ही मंडळी दर्यापूरला आली होती. सदर महिलेला प्रेम जाळ्यात उडून ठाणेदार साहेबांनी तिला आपल्या मुलगा व पतीपासून तोडले यासह पत्नीला गायब केल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात साहेबांची बदली होवून ते दर्यापुर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून रूजू झाले. ठाणेदार साहेबांच्या पत्नीला याबाबत माहिती झाल्यावर त्यांनी सुद्धा साहेबांना घटस्फ़ोट देवून मोकळे केले. अशी माहिती दिव्य कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
वैवाहीक जिवनाचा खेळखंडोबा झाल्यावर पुन्हा अभियंता पतीने स्वीकार केल्यानंतरही पत्नी काही दिवसांनतर मलकापूर येथून निघून गेली. त्यानंतर अद्याप पर्यंत परत आली नाही. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तक्रारीत नमूद केल्या नुसार १० फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील अंभियता पती कार्यालयात जात असताना अज्ञात व्यक्तीनी त्यांना अडवून अमुल बच्छाव यांचे नाव घेत त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. सदर प्रकरणी १८ फेब्रुवारीला जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे तक्रार करण्यात आली असून त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडे देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया –
“सदर प्रकरणाची चौकशी माझ्याकडे देण्यात आली असून यासंबंधात आज प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे यानंतर या संबंधित व्यक्तींचे, पुराव्यांच्या सुद्धा तपासण्या करता येतील, सद्यस्थितीत अमुल बच्छाव यांना अमरावती मुख्यालय रुजू करण्यात आली आहे, पुढील तपास आम्ही करत आहोत, तपासाअंती पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवण्यात येईल”.
गुरुनाथ नायडू, उपविभागीय पोलिस अधिकारी, दर्यापूर
“अमुल बच्छाव या व्यक्तीने माझ्या पत्नीला पळून नेले असून, तीन महिन्यापासून तिचा पत्ता लागत नाही, या संबंधात आम्ही पोलीस अधीक्षक अमरावती यांच्याकडे तक्रार केली असून या संबंधातील चौकशी पूर्ण करण्याकरीता आज आम्हाला बोलावण्यात आले होते, दर्यापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी आमचे बयान नोंदवल आहे, मला सहा वर्षांचा लहान मुलगा आहे, या व्यक्तीमुळे माझे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे, अमुल बच्छाव यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे”.
दिव्यकुमार शर्मा
तक्रार कर्ते