दर्यापूर – महेश बुंदे
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रयत्नांतुन समाज कल्याण विभाग व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय वानखेडे व कर्मचारी यांनी स्वाधार व स्वयं योजनेचा कॅम्प आयोजित करून गाडगे बाबा यांची जयंती संपन्न झाली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अनिल खेडकर, प्रमुख उपस्थिती म्हणून पूजा गौतम मॅडम, भावना वासनिक मॅडम, करुणा भोपळे मॅडम, महेश बुंदे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी करूणा भोपळे मॅडम म्हणाल्या की, गाडगे बाबा एक विचार आहे तो विचार प्रत्येकाने कृतित आणला पाहिजे. गाडगे बाबा यांचा विचार जयंती-पुण्यतिथी पुरता मर्यादेत न ठेवता सातत्याने आचरनात आणला पाहिजे असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमात समाज कल्याण विभागामार्फत स्वाधार व स्वयं योजनेतील कर्मचारी पूजा गौतम मॅडम, भावना वासनिक मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना असे म्हणाले की, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन वसतीगृहाची सोय करते. मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशाने काय करायचे. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना शासनाने नवीन योजना आणली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असे या योजनेचे नाव आहे.
