Post Views: 410
अकोला: प्रतिनिधी प्रेमकुमार गवई
मुर्तिजापूर: आज दि.२३ फेब्रुवारी रोजी राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्राम भटोरी येथे युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गान्या च्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून गाडगे महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भारतीय बौद्ध महासभा संघटक भीमराव वानखेडे हे गाडगे महाराज यांच्या भूमिकेत होते, त्यांनी या वेळी गाडगे महाराज यांनी जो दस सुत्री मंत्र दिले ते मंत्र लोकांना पटवुन सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय बौद्ध महासभा सल्लागार, पत्रकार प्रेमकुमार गवई व्यसन ही किड आपल्या बहुजन समाजाला लागली आहे.तरी सर्वांनी व्यसन मुक्त भारत घडवण्याचा संकल्प करायचा आहे असे प्रतिपादन गवई यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश हेंडजकर होते . कार्यक्रमाचे उपाध्यक्ष राजु गवळी हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल प्रभे, आभार सामाजिक कार्यकर्ते राहुल वानखेडे यांनी मानले. सागर ढवळे, घोंगळे, सनी वानखेडे, शुभम खंडारे, उपसरपंच घोंगळें यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथोनात परिश्रम घेतले.