Post Views: 547
अकोला: प्रतिनिधी प्रेमकुमार गवई
आज दि.23 फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराजांच्या 146 व्या जयंती निमित्त ,गावात शैक्षणिक वातावरण टिकून राहण्या करिता गोरेगाव येथे स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावातील 1 ते 9 च्या मुलांची चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
या मध्ये गावातील सर्वच मुले सहभागी झाले होते.मुलांनी या वेळी स्वच्छतेचे संदेश देणारे चित्र ,गाडगे महाराजांचे चित्र, संदेश,त्यांच्या जीवनावर आधारित निबंध लिहिले होते.या वेळी गावातील स्वयंसेवक योगेश सरदार,अमोल धांडे, अक्षय सरदार,लखन सरदार,सौरभ चोपडे प्रथमचे भावेश हिरुळकर उपस्थित होते.