चाकण येथील शासनमान्य सर्पमित्र बापूसाहेब सोनवणे यांना सर्पतज्ज्ञ निलीमकुमार खैरे पुरस्कार

चाकण येथील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सोनवणे यांचा आतापर्यंत च्या कार्याची दखल घेऊन त्यांना वन्य जीव पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच निलीमकुमार खैरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्य जनतेत साप व त्याविषयी असलेल्या गैरसमज याविषयी उल्लेखनीय कार्य करणारे प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ निलीमकुमार खैरे यांच्या हस्ते यावेळी राज्यभरातील १०५ सर्पमित्रांना निलीमकुमार खैरे पुरस्काराने गौरविण्यात आले.

वन्य पशु, पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर उषा ढोरे, शंकर जगताप, वन्य पशू, पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सुरेखा बडदे,
सचिव विनायक बडदे, अनिल खैरे, मानद वनरक्षक अदित्य परांजपे, सर्प अभ्यासक देवदत्त शेळके, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्राणीतज्ञ दिलीप कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

बापूसाहेब सोनवणे हे गेल्या वीस वर्षांपासून सर्प,वन्य जीव रक्षण,वृक्षारोपण इ तसेच इतर सामाजिक कार्यात देखील सक्रिय आहेत.चाकण येथील वनविभागाच्या वतीने ते अनेक रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी असतात.वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सर्पमित्र चाकण मध्ये कार्यरत असल्याचे ते सांगतात.बापूसाहेब सोनवणे यांनी स्वतः अनेक सर्पमित्र घडवले असून ते त्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात.त्यांचे शिष्य शांताराम गाडे यांनाही यावेळी निलीमकुमार खैरे पुरस्काराने गौरविण्यात आले.तसेच अतुल सवाखंडे आणि संतोष काटे यांनाही गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन प्रमोद कांबळे, राहुल कांबळे,धनश्री कांबळे, उमेश शिरसट आदींनी केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!