Post Views: 528
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आजोजन
बातमी संकलन – महेश बुंदे
शिवजयंतीच्या शुभपर्वावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे यांच्या मार्गदर्शनात इ- श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सर्व सामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा या करिता थेट गाव पातळीवर या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस हर्षल खाडे मित्रपरिवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखा धामोडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
या शिबिरात तब्बल १५० नागरिकांनी इ- श्रम कार्ड नोंदणी केली. शिबिराच्या यशस्वीते करिता सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य कर्मचारी, गावकरी मंडळी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितिन गावंडे, तालुका कार्यध्यक्ष गौरव गावंडे, विद्यार्थीची जिल्हा समन्वयक ऋषिकेश चिकटे, जेष्ठ नागरिक अजबराव खाडे, ललित पाटील गावंडे, अमोल पाटील गावंडे, संतोष इंगळे, दीपक कावनपुरे, सर्कल प्रमुख गजानन मानकर, अनुज चौधरी, विद्यार्थी उपाध्यक्ष क्षितिज गावंडे, सुजल गावंडे, अमोल डायलकर, दत्ता गावंडे, भोला डीक्कर, गौरव डीक्कर, दीप गावंडे, वेदांत खाडे, व तरुण युवा सहकारी मित्र उपस्थित होते.