शिवप्रेमी युवकांनी केले वेगवेगळ्या प्रकारे अभिवादन
दर्यापूर – महेश बुंदे
सर्व महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणामय वातावरणात अख्या महाराष्ट्र दुमदुमुन निघाला यातच शिवप्रेमी प्रतिष्ठान कोकर्डा पंचक्रोशी मधील युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून शिवजयंती साजरी केली.
