मोक्का केसमधील दोन मोस्ट वाँटेड सराईत गुन्हेगारांना ११ महिन्यानंतर समर्थ पोलीस स्टेशनने ठोकल्या बेडया ; तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी

पुणे वार्ता :- समर्थ पोलीस ठाणे कडील गु.र.नं. ४० / २०२१ भादवी कलम ३०७, १०९, १४३, १४७, १४८, १४९, ५०४,५०६ महा पोलीस अधि. कलम ३७ १३ सह १३५ आर्म अॅक्ट कलम ४ २५ व क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ व मोका अॅक्ट कलम ३ (१) (11)३ (२) ३ (४) अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयात या अगोदर पाच आरोपींना अटक केली असून ते सध्या जेलमध्ये आहेत. परंतू दाखल गुन्हयातील दोन आरोपी नामे शुभम पवळे व आकाश सासवडे हे मोस्ट वाँटेड मोक्का केस मधील आरोपी मागील ११ महिन्यापासून फरार होते. त्यांना पकडण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश झाले होते.

सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा परिमंडळ स्तरावर व पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळ्या टिम तयार करून काम चालू होते. परंतू आरोपी १) शुभम दिपक पवळे, वय २४ वर्षे, धंदा काहीनाही, रा. लक्ष्मीनगर, गजानन महाराज मठासमोर, दत्तवाडी, पुणे २) आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे वय २२ वर्षे, रा. डयुल्या मारुती जवळ, २६६ गणेश पेठ, पुणे हे शातीर व चानाक्श असलेने ते पोलीसांना गुंगारा देत होते. मागील ११ महिन्यामध्ये दोन्ही आरोपी हे आपले वास्तव्य लपवून वेळोवेळी ठिकाणे बदलून रहात होते. त्यांनी गुन्हा दाखल झालेनंतर शिरवळ, सातारा जवळील गांवामध्ये १० दिवस लपून राहीले.

पहा व्हिडिओ

नंतर ते दोघे जण सहा महिने भारतात वेगवेगळ्या राज्यात राहीले आहेत. दरम्यानचे काळात ते जम्मू येथील वैष्णोदेवीला फिरायला गेले होते. त्यांना असे वाटले की आता वातावरण शांत झाले आहे असे समजून ते पुण्यात आले. सुरवातीला ते खडकवासला येथील लॉजला पाच दिवस राहीले होते. नंतर ते एक महिनाभर साधारण नोव्हेंबर २०२१ मध्ये देवाची ऊरुळी गांवात एका मित्राकडे एक महिनाभर राहीले. नंतर ते दोघे डिसेंबर २०२१ मध्ये मुंबई येथे बोरीवली पश्चिम येथे भाडयाने घेतलेल्या रुममध्ये एक महिनाभर रहात होते. तसेच ते चार दिवस बारामती येथे सुध्दा राहीले आहेत.

नंतर ते दोघे मुंबईहून पुणे येथे आले व ते लोहगांवच्या पुढे वडगांव शिंदे गावातील जाधववस्ती येथे भाडयाने रुम घेवून आपले आस्तीत्व लपवून रहात होते. नमुद आरोपींना पकडण्यासाठी या अगोदर तपास पथकातील सपो निरी संदीप जोरे व पोलीस अंमलदार यांनी कधी झोमॅटो डिलेव्हरी बॉय, कधी दुधवाला तर कधी गॅरेज मेकॅनिक बनून आरोपींबाबत माहिती काढत होते.

पहा कारवाई व्हिडीओ

दि. २१/२/२०२२ रोजी समर्थ पोलीस ठाणेचे तपास पथकातील अधिकारी सपोनिरी संदीप जोरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाँटेड आरोपींची तांत्रीक माहिती गोळा करून अंमलदारांच्या चार टिम तयार केल्या व सकाळी पाच वाजलेपासून योग्य प्रकारे नियोजन करून चारही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून मोस्ट वॉटेड आरोपींना ताब्यात घेवून त्यांना सायंकाळी ४/३० ला अटक करण्यात आली आहे. समर्थ पोलीस स्टेशनचे व तपास पथकाचे वरिष्ठांकडून कौतूक करण्यात आले. मा. मोक्का न्यायालयात हजर केले असता त्यांना १० दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती प्रियंका नारनवरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ पुणे शहर, मा. श्री. सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, उल्हास कदम, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार सहा. पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सतिश भालेराव, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, श्याम सुर्यवंशी, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, शरद वाकसे, संतोष थोरात, सुनिल हासबे, मपोशि छाया देवकर यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!