बातमी संकलन – महेश बुंदे
तालुक्यातील चिंचोली (रहिमापुर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहिगाव येथील शेतकऱ्यांने नापिकी कर्जाच्या विवंचनेतून राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुधवार (दि.१६) सायंकाळी ५ वाजता दरम्यान उघडकीस आली असता त्यांना इर्विन रुग्णालय, अमरावती येथे नेण्यात आले असून उपचार दरम्यान (दि.२१) रोजी प्राणज्योत मावळली.
