दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील सांगळूद येथे गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पारायणं सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहामध्ये दैनंदिन विजय ग्रंथाचे वाचन सौ, विद्याताई गावंडे, सौ निलिमाताई गावंडे, सौ आश्विनी ताई गावंडे, सौ कळमकर यांच्या अमृत वाणीतून पारायणाचे वाचन करण्यात आले, हा सोहळा तारीख १६ ते २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आयोजीत केला आहे. २३ फेब्रुवारी दुपारी २ वाजता श्रीमद विजय ग्रंथांचे व गजानन महाराज पालखीचे शोभा यात्रा व दिंडी सोहळ्याचे आयोजन केले असून २३ फेब्रुवारीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
