Post Views: 432
२ लॅपटॉप व रोख रक्कम असा एकूण ८७,०००/-रू. चा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह साहेब, वाशिम यांनी जिल्हयातील अवैध धंद्यांचे
समुळ उच्चाटन करून कायदेशिर कारवाई करणे बाबत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला सक्त
आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कडक कारवाया सुरू आहेत.
फिर्यादी नामे डॉ. सचिन दशरथ कड, वय ४२ वर्ष, धंदा-डॉक्टर (वैद्यकिय व्यवसाय), रा.माउली हॉस्पीटल च्या वर, अकोला नाका, वाशिम यांनी दि. २७/१२/२०२१ रोजी पो.स्टे.वाशिम शहर येथे येउन फिर्याद दिली की, दि. २०/१२/२०२१ रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास ते व त्यांची पत्नी व मुले घरातील दरवाज्याला कुलूप लाउन काश्मिर येथे फिरावयास गेले होते. दि. २७/१२/२०२१ रोजी सकाळी ०४:१५ वाजताच्या सुमारास फिर्यादी काश्मिर हून त्यांच्या घरी वाशिम येथे परत आले व त्यांनी घरात जाउन पाहिले असता घरातील त्यांनी सि.सि.सी.टि.व्ही. कॅमे-यांवर स्प्रे मारून घराचा दरवाजा गॅस कटरने कापलेला दिसला व त्या
पलीकडे जाउन पाहिले असता लोखंडी जाळी व टिन देखील कापलेले दिसले व घरातील सोन्या चांदीच्या वस्तू, रोख रक्कम व ०२ लॅपटॉप अशी एकूण १,८४,०००/- रू. ची मालमत्ता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर फिर्यादी हे पो.स्टे. ला आले असता त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पो.स्टे. वाशिम शहर अप.क. १४४१ /२०२१, कलम ४५४,४५७,३८० भा.दं.वि. अन्वये नोंद करण्यात आला.मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो. यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रफीक शेख यांनी सदर गुन्हयाच्या तपासाबाबत डि.बी. पथकास
आदेश देउन रवाना केले असता डि.बी. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे देवानंद वसूदेव डाखोरे, वय २५ वर्ष, धंदा-शेती, रा. नारायण शिंदे यांच्या घराच्या शेजारी, भिलदूर्ग,
ता. मालेगाव, जि. वाशिम यास त्याच्या राहते घरून ताब्यात घेउन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देउन त्याने सदरचा गुन्हा त्याच्या १) अजय रमेशराव शेंडे, वय३२ वर्ष, रा. सहजपुर, ता. दौंड, जि. पुणे २) शिवाजी उत्तम गरड, वय २५ वर्ष, रा. करंजी,ता. मालेगाव, जि. वाशिम ३) ऋषिकेश काकासाहेब किर्तीके, वय २२ वर्ष, रा. देवधानोरा, ता.कळंब, जि. उस्मानाबाद ४) सुमित आबा वाघमारे, वय २३ वर्ष, रा. देवधानोरा, ता. कळंब, जि.उस्मानाबाद ५) संदीप दत्ता लहाने, वय २७ वर्ष, रा. करंजी. ता. मालेगाव, जि. वाशिम व ६)सचिन प्रल्हाद कांबळे, वय ३४ वर्ष, रा. पंचशिल नगर, वाशिम यांच्या सह केला असल्याचे सांगितले.
१) अजय रमेशराव शेंडे, वय ३२ वर्ष, रा. सहजपुर, ता. दौंड, जि. पुणे २) शिवाजी ऊत्तम गरड, वय २५ वर्ष, रा. करंजी, ता. मालेगाव, जि. वाशिम ३) ऋषिकेश काकासाहेब किर्तीके, वय २२ वर्ष, रा. देवधानोरा, ता.कळंब, जि. उस्मानाबाद या आरोपींना यवत पोलीस स्टेशन, जि. पुणे यांनी अटक केली असल्याने त्यांना दि. १०/०२/२०२२ रोजी प्रोडयुस वॉरंटद्वारे दि. १०/०२/२०२२ रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून इतर आरोपी सुमित आबा वाघमारे, वय २३ वर्ष, रा. देवधानोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद यास दि.
१०/०२/२०२२२ रोजी त्याच्या राहते परिसरातून अटक करण्यात आली असून इतर आरोपी नामे संदीप दत्ता लहाने, वय २७ वर्ष, रा. करंजी. ता. मालेगाव, जि. वाशिम व सचिन प्रल्हाद
कांबळे, वय ३४ वर्ष, रा. पंचशिल नगर, वाशिम यांना दि. १९/०२/२०२२ रोजी वाशिम येथूनच अटक करण्यात आली असून अटक आरोपींकडून डेल कंपनीचे ०२ लॅपटॉप किं रू.७९,०००/- व रोख रक्कम रू. ८,०००/- असा एकूण ८७,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो., अपर पोलीस अधिक्षक श्री.
गोरख भामरे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिलकुमार पुजारी सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. रफीक शेख यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि खंदारे,पो.ह.क. लालमणी श्रीवास्तव, पो.ना.क. रामकृष्ण नागरे, पो.शि.क. मात्रे, पो.शि.क. विठ्ठल महाले ,व पो.शि.क. संदीप वाकुडकर यांनी पार पाडली आहे.