शाश्वत स्वच्छतेसाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आवश्यक : सीईओ वसुमना पंत

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम: गावात शाश्वत स्वच्छता निर्माण होण्यासाठी प्रत्येक घरातील कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी व्यक्त केले.

स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत (दि. 21) घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी नियोजन भवन येथे त्या बोलत होत्या.
यावेळी ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मापारी, सिंबाॅसिस सेंटरचे डाॅ. मानिकप्रभु धानोरकर, वरदा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक विनेश काकडे, वर्धा जि. प. च्या पाणी व स्वच्छता विभागाचे कार्यक्रम व्यवस्थापक सचिन खाडे, स्वच्छता तज्ञ अशोक रत्नपारखी आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागापाणी व स्वच्छता विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने यांची यावेळी उपस्थिती होती.
होते.

सीईओ वसुमना पंत पूढे बोलतांना म्हणाल्या की घनकचरा व सांडपाणी याबाबत वैयक्तिक पातळीवर जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. यासाठी ही लोकचळवळ होण्यासाठी बचत गटातील महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांचा सहभाग घेणे आवश्यक आहे.


स्वच्छता तज्ञ रत्नपारखी म्हणाले ओला व सुका कचरा घरातून वेगळा करून घेणे हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी लोकांना ओला- सुका कचरा म्हणजे काय याची पुरेशी माहिती नाही. तरी ओल्या कचऱ्यामध्ये खराब फळे, भाज्या, उरलेले अन्न, अंडय़ाचे कवच, नारळ, शहाळी, हाडे अशा विघटन होणाऱ्या बाबीचा समावेश होतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टीक पिशव्या, रबर, थर्माकॉल, काचेच्या बाटल्या, काच, बॅटरी सेल, धातू, खिळे अशा गोष्टींचा समावेश होतो. घनकचरा व्यवस्थापन बाबत शोषखड्डा, परसबाग,पाईप रुप झोन सिस्टिम परस बाग, सार्वजनिक पाझरखड्डा, सांडपाणी स्थिरीकरण तळे, घरगुती खतखड्डा,जमीनीतील बांधील खतखड्डा,नाडेप पध्दत, गांडूळ खत, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन याबाबत तांत्रिक व सविस्तर मार्गदर्शन विनेश काकडे आणि सचिन खाडे यांनी केले. गोबरधन योजना व शासनाची भूमिका याबाबत डाॅ. माणिकप्रभु धानोरकर यांनी सादरीकरण केले. मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी मॅजिक पिट बाबत मार्गदर्शन केले.

जल जीवन मिशन अंतर्गत लघु माहितीपटाचे प्रसारण!
या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते मानोरा तालुक्यातील पिंपळशेंडा (ग्रा.पं. उमरी बु.) या गावातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या लघु माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. जल जीवन मिशन या योजनेतुन या गावात नळ योजना साकारण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण समन्वयक प्रफुल्ल काळे यांनी केले. सुत्रसंचलन शंकर आंबेकर यांनी केले. आभार प्रदर्शन क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे यांनी केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!