प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने आदर्श ग्राम येडशी येथील समता मित्र मंडळ व युवा कार्यकर्ते मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा सारनाथ बुद्धविहीर येथे मोठया उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रत्येक समाजातून प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी व्हायला पाहिजे समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा याउद्देशाने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन येथील मंडळाच्या वतीने करण्यात येते.
