वाशीम | कोरोना अनुदानासाठी मृतांच्या कायदेशीर वारसांनी 24 फेब्रुवारी रोजी कागदपत्रांसह उपस्थित रहावे

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम : कोविड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना जिल्हा शल्य चिकीत्सक, वाशिम यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 640 मृत व्यक्तींपैकी 353 मृत व्यक्तींच्‍या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज केलेला नाही अशा 287 मृत व्यक्तींची यादी https://washim.gov.in या संकेतस्थळावर तालुकानिहाय प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

287 मृत व्यक्तींच्या वारसदारांनी 24 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे तालुकानिहाय दिलेल्या वेळेत पुढील कागदपत्रांसह उपस्थित रहावे. अर्जदाराचा स्वत:चा तपशिल यामध्ये आधारकार्ड व त्याच्या छायाकिंत दोन्ही बाजूची प्रत, अर्जदाराचे बँक पासबुक-क्रॉस चेक, मृत पावलेल्या व्यक्तींचा तपशिल यामध्ये आधारकार्डचे दोन्ही बाजू, मृत पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, एखाद्या नातेवाईकाचे नाव सानुग्रह अनुदान जमा करण्यासाठी इतर कुटूंबियांचे स्वयंघोषणापत्र (नाहरकत) व एमसीसीडी प्रमाणपत्र. या प्रमाणपत्राचा नमुना https://washim.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील कागदपत्रे स्पष्ट दिसेल असे स्कॅन करुन खालील दिलेल्या वेळेत नियोजन भवन येथे उपस्थित रहावे. वाशिम तालुका- सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, मालेगांव तालुका- दुपारी 1 ते दुपारी 2 पर्यंत, रिसोड तालुका- दुपारी 3 ते दुपारी 4 पर्यंत, मानोरा व कारंजा तालुका- दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि मंगरुळपीर तालुका- सायंकाळी 5 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

तरी मृत पावलेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह 24 फेब्रुवारी रोजी नियोजन भवन, वाशिम येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!