प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती तोंडगाव येथे संत रविदास चर्मकार युवा महासंघ व फाउंडेशन आणि जय रविदास मित्रमंडळ तोंडगाव यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले आणी गुरू रविदास महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली.
