Post Views: 446
रामेश्वर पाटील भडांगे व गोकुळ पाटील भडांगे यांचे वर्चस्व
दर्यापूर – महेश बुंदे
गेल्या ३५ वर्षापासून अखंडपणे सेवा सहकारी संस्था मर्या. जसापुर र न ३६७ या संस्थेवर रामेश्वर भडांगे व गोकुळ पाटील भडांगे यांचे वर्चस्व कायम असून नुकतीच झालेली सेवा सहकारी संस्था जसापूरची निवडणूक नुकतीच झाली असता, त्यामध्ये रामेश्वर पाटील भडांगे, गोकुळ पाटील भडांगे यांच्या एकता पॅनलचे उभे केलेले सर्व उमेदवार एक मताने निवडून आले असून प्रफुल पाटील भडांगे यांच्या पॅनलचा धुवा उडाला आहे.
यामध्ये अजय दामोदर भडांगे, जोशना सतीश भडांगे ,सौ पद्माताई गोकुळराव भडांगे ,श्री दिलीप शिवराम शिरसाट, प्रवीण पंजाबराव नागे, विनोद पंजाबराव भडांगे, अमित रामेश्वर भडांगे ,गोकुळ जगन्नाथराव भडांगे ,रामप्रकाश नारायण भडांगे ,विलास दादाराव भडांगे, शुभांगी मनोहर भडांगे व संजय प्रल्हादराव भडांगे आधी उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले.