स्वराज्य वार्ता प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-बहुजनांच्या न्याय हक्काचं शस्त्र असलेले सम्राट टाइम्स वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कालकथित जिजाई ज्ञानदेव तायडे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम क्रमांक ₹३००१ रुपये,स्मृतिचिन्ह सन्मानपत्र,द्वितीय क्रमांक ₹२००१ रुपये,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,तृतीय क्रमांक ₹१००१ रुपये,स्मृतिचिन्ह,सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.१० उत्कृष्ट कवितांची ‘जिजाई ‘पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
