छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2022 रोजी ग्रामीण युवा संघटना संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली विशेषता पारस येथील जिल्हा परिषद शाळेतील काही गरजू विद्यार्थ्यांना ग्रामीण युवा संघटना तालुकाध्यक्ष अमोल खंडारे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व महाराजांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून पारस येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका रुपाली मालोदे मॅम, प्रीती धाडसे मॅडम, अंगणवाडी सेविका शालिनी दांदले,कमल हिवराळे, अंबिका राऊत, लक्ष्मी तायडे, ज्योती खंडारे, प्रशांत इंगळे सर आवर्जून उपस्थित असलेले ग्रामीण युवा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र इंगळे, राजेश तुटोकार, सागर नाटेकर, शैलेश खंडारे प्रकाश खंडारे, ओम गाडगे, जय खंडारे, प्रतीक सोनोने, सिद्धांत खंडारे, इत्यादी जे सहकार्य लाभले व अकोला जिल्ह्यातील बाकीच्या गावामध्ये महाराजांना ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने मानवंदना देण्यात आली.