प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – रयतेचे राजे, स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक अयोध्यानगर येथे नवयुवकांच्या सहभागातून साजरी करण्यात आली. यावेळी सामाजीक उपक्रम म्हणून नगरातील दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ.सौ. जयश्री गुट्टे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून भानुदास गोटे, प्रकाश गोटे, अमोल पळशीकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. नंतर सर्वानी शिवरायांना अभिवादन केले. जयंतीनिमित्त सामाजीक उपक्रम म्हणून अयोध्यानगर येथील दत्त मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या वृक्षांचे संवर्धन व संगोपनासाठी रोपट्यांना लोखंडी जाळी लावण्यात आली. यावेळी लिंब, अशोका, उंबर, बेल आदी वृक्ष लावण्यात आले.
