प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – स्थानिक म्हाडा कॉलनी येथे पुरुषोत्तमबाबा बहूउद्देशिय संस्थेच्या आयोजनातुन शिवजयंतीचा कार्यक्रम तसेच शिव चरित्रावर पोवाडे व गितगायनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीर व माजी जि.प. सदस्य के.के. डाखोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, समाजसेवक राजाभैय्या पवार, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, शिवसैनिक युवराज शांकट, युवासेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, भाऊराव खांबलकर, सौ. माधुरी खांबलकर, सखाराम ढोबळे, मदन काळे यांच्यासह कलावंतांची उपस्थिती होती.
