Post Views: 395
ऑस्ट्रेलिया व कॅनडामधून पाहुण्यांची आभासी उपस्थिती
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – बुद्धसासना फाऊंडेशन व ख्येन्त्से फाऊंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान तालुक्यातील ग्राम अडोळी येथे एकदिवशीय बुद्धधम्माव्दारे व्यक्तिविकास शिबीर तथा विपश्यना व धम्मदेसना शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्ध मैत्रेया प्युअर लॅन्ड मेडिटेशन केंद्र आणि जपानी गार्डनमध्ये होणार्या या शिबीराला वल्ड बुद्धीस्ट मिशन जपानचे अध्यक्ष मेधंकर रवी, बोधगया यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तर मेलबर्न, ऑस्ट्रेलियाचे विपश्यनाचार्य आचार्य अँड्रयू विल्यम्स व सामुराई बुद्धीस्ट सेंटर टोरांटो, कॅनडाचे रेव्हरंड झेंजी निओ यांचे आभासी मार्गदर्शन लाभणार आहे. तर पुण्याचे बुद्धीस्ट स्कॉलर अमर माने यांची विशेष उपस्थिती राहील.
आजच्या धावपळीच्या युगात मानवाचे जीवन नैराश्यांनी ग्रस्त आहे. मनुष्य महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेल्या तत्वाचे फक्त वाचन करतो, त्याचे अनुकरण करत नाही. मनुष्याला या नैराश्यातुन बाहेर काढून त्याच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी हे शिबीर ठेवण्यात आले आहे. शिबीराचे सुत्रसंचालन अॅड. प्रमोद पट्टेबहादूर व सिद्धार्थ पडघान हे करतील. तरी जिल्हयातील बौद्ध उपासक उपासिकांनी या शिबीराला उपस्थित राहावे असे आवाहन शिबीर आयोजक मधुकर पडघान, अशोक खंडारे, संदीप पडघान, अमोल खंडारे, मदन पडघान, हरिष पडघान, विजय पडघान, रमेश पडघान, उत्कर्ष कला गायन पार्टी, पंचशिल गायन पार्टी, द ग्रेट अशोक क्रीडा मंडळ, कलम का बादशहा क्रीडा मंडळ, यशोधरा महिला मंडळ, समता सैनिक दल आदींनी केले आहे. हे शिबीर शासनाच्या कोविड नियमाचे काटेकोरपणे पालन करुन पार पाडण्यात येईल असे पंकज पडघान यांनी सांगीतले.