प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-शेतकर्यांनी शेतीला आता एका वेगळ्या वळणावर नेण्याची आवश्यकता आहे. पारंपारिक शेतील तडा देऊन मागनीप्रमाणे बदल केल्यास शेतकर्यांच्या ऊत्पादनात आणि अर्थातच एकंदरीत जिवनात अमुलाग्र बदल घडु शकतो. या पार्श्वभूमिवरच सर्व धर्म मित्रमंडळ कारंजा गेल्या पाच वर्षापासून विषमुक्त सेंद्रिय शेती त्याचप्रमाणे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा याकरिता कृतिशील कार्य करत आहे. त्यामुळेच खपली गहु ऊत्पादकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता राज्यस्तरीय स्व. सौ गंगाबाई रामदास सवाई खपली गहू शेती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. परिणामी या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहे. महाराष्ट्र व ईतर भागातला खपली गव्हाचा पेरा वाढावा हा त्यामगील हेतु आहे.
