शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही..

प्रतिनिधी नीरज शेळके :-

ठाणे (21 )- ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील राँ वाँटर पंपिग स्टेशन मध्ये वाढीव क्षमतेचे पंपिग मशीन बसविण्याचे काम चालू असून सदर प्रकल्पातील दुसरा पंप चालू करणे व त्या अनुषंगाने इतर कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मे. स्टेम प्राधिकरणाने देखभाल दुरूस्ती तसेच महत्वाच्या कामाकरिता शुक्रवारी 22/10/2021 रोजी सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे शहराचा पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे.

सदर दिवशी घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट,समतानगर, आकृती, सिध्देश्वर, जेल, जाँन्सन, इटरनिटी, ब्रह्मांड, विजयनगरी, बाळकूम, कोलशेत, आझादनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, साकेत, रूस्तमजी इ. भागात तसेच कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!