Post Views: 739
दावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सौ उज्वला शिंदे व व्हा चेअरमन मल्हारी तरटे यांची एकमताने निवड
पुणे वार्ता :- दिनांक 20 ऑक्टोबर
रोजी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन ची निवड झाली निवड प्रक्रियेचे काम निवडणूक अधिकारी श्री मुलानी साहेब यांनीं पाहीले.
दावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची स्थापना दिनांक 22 मार्च 1922 रोजी झाली आणि आज या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहे येत्या पाच महिन्यांमध्ये सोसायटीचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम महिला चेअरमन होण्याचा बहुमान सौ उज्वला राघुजी यांना मिळाला आहे.
महीला सबलीकरणाच्या दृष्टीने सुवर्णमहोत्सवी वर्षातील हा सुवर्णक्षण आहे
खेड तालुक्यातील पूर्व पट्ट्यामध्ये दावडी सोसायटी ही सर्वात मोठी सहकारी सोसायटी आहे जवळपास 1600 पेक्षा जास्त सभासद आहेत या
संस्थेमार्फत शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी सदैव अग्रेसर आहे या पुढील काळामध्ये शेतकर्याना अर्थिक पाठबळ देण्याकरिता शेतकरी हिताचे निर्णय घेऊन त्यावर कार्यवाही केली जाईल असे सौ उज्वला शिंदे यांनी सांगितले.
यावेळी सोसायटीचे मावळते चेअरमन रामदास अनंता बोत्रे व्हाईस चेअरमन विजय ओव्हाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदावर झाल्यामुळे ही निवडणूक झाली.यावेळी उपस्थित दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील ,सरपंच संभाजी घारे,उपसरपंच राहुल कदम, यूवा नेते सचिनशेठ नवले,मा उपसरपंच हिरामण खेसे, सदस्य अनिल नेटके मा जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई सातपुते मा सरपंच भाऊसाहेब होरे ,साहेबराव दूंडे मा सरपंच संतोष गव्हाणे, संतोष गावडे, दत्तात्रय मांजरे ,माणिक लोणकर बबनराव शिंदे बाळासाहेब वाघिरे,संतोष लोणकर, पांडुरंग दूंडे मारुती बोत्रे राघुजी शिंदे संतोष मांजरे आनंदा शिंदे ग्रा प सदस्या पुष्पा होरे संगिता होरे सारिका शिंदे सरस्वती होरे भरत ववले संतोष ववले अनिल काळे बाळासाहेब दूंडे रमेश होरे सचिन ननवरे सूनिल जाथव इतर मान्यवर उपस्थित होते.