दर्यापूर – महेश बुंदे
“शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात” या उपक्रमा अंतर्गत दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथे अनेक ठिकाणी व घराघरात उत्साहात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यामध्ये सार्वजनिक स्थळी ग्रामपंचायत कार्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,राष्ट्रीय विद्यालय व राष्ट्रीय मागासवर्गीय वसतिगृह येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच गावातील बाल शिवव्याख्याता पार्थ संतोषराव ठाकरे यांच्या घरी बाल मित्र परिवार यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.तसेच रणजित देवीदासराव बिडकर यांच्या घरी सुद्धा मित्र परिवार यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
