१५३ रक्तदात्यांचे देशाला प्राणाची आहुती देणार्या शहिद पंजाब जानराव उईके यांच्या वीरमाता बेबीताई यांना अभिवादन ; रक्तदानात विद्यार्थींनींचा व महिलांचा उत्स्फुर्त सहभाग
बातमी संकलन – महेश बुंदे
चांदूरबाजार वार्ता – स्थानिक गो. सी. टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट द्वारा संचालित गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख शिक्षण महाविद्यालय, स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख अध्यापक महाविद्यालय व निर्मिती पब्लिक स्कुल आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्य तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीला २०२२ ला उरी येथे शहीद जवान पंजाब जानराव उईके यांच्या वीरमाता बेबीताई जानराव उईके यांची रक्ततुला आयोजित करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव भास्करदादा टोम्पे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती प्रीती बोन्द्रे, सहआयुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती, सत्कार मूर्ती श्रीमती बेबीताई उईके, अजय दातेराव, उपाध्यक्ष रक्तदान समिती, प्रा. राकेश ठाकूर, शाम शर्मा, डॉ. विजय टोम्पे, दिनेश शेळके, उमेश चौकडे, सैनिक धीरज सातपुते, माजी सैनिक मेजर गणिभाई सौदागर, श्री. सुधीरभाऊ दाभाडे, श्री. राजकुमार इंगळे, श्री. शालिकराम पारवेकर प्राचार्य राजेंद्र रामटेके, प्राचार्य डॉ. संजय सेजव, सावरकर सर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला याप्रसंगी संत गाडगे बाबा, स्व. सजय टोम्पे व स्व. समीर देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून प्राचार्य डॉ. संजय सेजव यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका सविस्तर विशद केली. सैनिक धीरज सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करत असतांना उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्याबाबत शब्दचित्र डोळ्यासमोर व्यक्त केले. श्रीमती प्रिती बोंद्रे यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या की आपली संस्था ही देशाकरीता शहीद सैनिकाच्या आईची रक्ततुला करुन समाजाला रक्तदानासोबत देशप्रेमाचा संदेश देत आहे ही सर्वांसाठी गौरवाची व प्रेरणा घेण्याची बाब असल्याची भावना व्यक्त केली. सदर रक्ततुलाच्या कार्यक्रमास श्रीमती पूनम पाटील, पोलीस उपायुक्त, अमरावती व श्री अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, ग्रामीण यांनी आपल्या शुभेच्छा संदेश दिल्या. तत्पूर्वी ११वी विज्ञानची विद्यार्थीं कु. मनश्री अढाऊ हिने शिवजयंतीच्या पर्वावर शिवचरित्र सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे यांनी महाविद्यालयाने आयोजित रक्तदान समाजातून आणि विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद बघता ही सामाजिक चळवळ असून गरजू रुग्णास या रक्तदान चळवळीमुळे जीवदान मिळते त्यासाठी संस्थेचे नेहमीच प्रयत्न असतात. आपल्या भाषणास रक्तदानाचे महत्व सांगत जवानांच्या हस्ते निर्मिती पब्लिक स्कुल मध्ये ध्वजारोहन करण्यात येते आणि रक्ततुला करुन असून शहीद जवानांच्या कुटुंबाच्या सन्मानसोबत देश प्रेम सुध्दा तरुणांमध्ये जागृत होण्याचे काम आम्ही करतो त्या करीता आमचे विद्यार्थी तसेच चांदूरबाजार नगरीतील सर्व संघटना आम्हाला मदत करतात त्याबाबत आभार करत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाद्वारे श्रीमती बेबीताई उईके यांचा साडी-चोळी पुस्तक देऊन सत्काराबरोबरच रक्ततुलाही करण्यात आली.या भव्य रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक, परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना सहभागी होऊन एकुन १५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सदर रक्तदान शिबिरासाठी पी. डी. एम. सी. अमरावती येथील रक्तपेढी चमू डॉ. प्रियंका चांडक, हरीसखान, कुणाल वरघट, संजय दहिकर, अतुल साबळे, दिनेश चरपे, सुरज नागपुरे यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रविकांत कोल्हे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, महिला कार्यक्रम अधिकारी यांनी मानले. या भव्य रक्तदान शिबिराचे व रक्ततुला कार्यक्रमाचे नियोजन श्री. भास्करदादा टोम्पे, सचिव, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ. रविकांत कोल्हे, प्राचार्य डॉ.संजय सेजव, प्र-प्राचार्य मनीष सावरकर व डॉ. मंगेश अडगोकर, रासेयो, कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, रासेयोचे स्वंयसेवक यांच्या सहकार्याने आयोजन केल्या गेले. सदर कार्यक्रमाचे महाविद्यालयाच्या यूट्यूब ला थेट प्रक्षेपण करण्यात आले.
या रक्तदानात अनेक विदयार्थी, माजी विदयार्थी, रासेयो विदयार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व परिसरातील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तथा पत्रकार बंधू मोठ्या संख्येने प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करत सहकार्याबाबत आभार व्यक्त केले.