(महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळणार एक प्रेरणादायी गीत)
अमरावती/प्रतिनिधी जयकुमार बुटे
चित्रपट, अलबम्स, वेबसिरीज इत्यादी कलाकृत्या मनोरंजक होण्यासाठी गरजेचं असतं उत्तम कथा, पटकथा, दिग्दर्शन, दर्जेदार अभिनय, संगीत आणि त्याची जाहिरात इत्यादी.काहीएक वर्षांपूर्वी या गोष्टी केवळ चित्रपटांमध्येच दिसायच्या, त्यामुळे ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घालायचे. अशाच चित्रपटांमुळे हिंदी, मराठी आणि इतर चित्रपटसृष्टीला नावलौकिक मिळाला.
या गोष्टी जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर कोसो दूर होत्या. मात्र इंटरनेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये क्रांती झाली आणि ग्रामीण कलाकारांना जणू मोठी संधीच यानिमीत्ताने मिळाली. आज ग्रामीण भारतातील मोठा टक्का आपापल्या पद्धतीने इंटरनेटचा वापर करुन स्वतःला सिद्ध करताना दिसतो आहे. आणि अशात विदर्भही आता मागे राहिलेला नाही. अशीच काहीशी कहानी आहे विदर्भातील अमरावतीच्या एमपीएससी अँथेम साँगची!
एमपीएससी करणारा मुलगा म्हटलं की कुठेतरी तो अभ्यासात गुंतलेला, अभ्यासिकेत रमणारा, क्वचितच घराच्या बाहेर, नातेवाईकांमध्ये दिसणारा वगैरे त्याची ओळख ठरु शकते. त्यात आज परीक्षा दुर्मिळ झाल्यात. आधीसारख्या होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सरकारच्या चुकीच्या ध्येयधोरणांचे बळी ठरलेले विद्यार्थी परीक्षा आल्यानंतर कसे हुरळून जातात, त्यांचा आनंद कोणत्या स्तरावर पोहोचलेला असतो ती कहानी या गाण्यात दाखविण्यात आलेली आहे. हे गाणं विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा देणारं आहे.
अमरावती येथे स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी शिकविणारे शिक्षक आशिष भाकरे सर हे विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करीत असतात. शिक्षणासोबतच मुलांतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी ‘एबीसी फिल्म’ या यूट्यूब चॅनलची निर्मिती केली असून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील इतर बाजूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चॕनलच्या क्रिएटीव्ह डिपार्टमेंटद्वारा अविरत चालू असतो. त्यामध्ये एमपीएससी स्ट्रगलर ही वेबसिरीज, एमपीएससी चालता बोलता हा पब्लिक शो इत्यादींचा समावेश आहे.
एबीसी फिल्मतर्फे येत्या 20 फेब्रुवारी रोजी “किती मनाला वाटतं बरं रं, एक्झाम आल्यावर” या शीर्षकाखाली स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व त्यांच्या जीवनातील सुखदु:खांना प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न चॕनलच्या क्रिएटीव्ह टीमने केलेला आहे. विशेष म्हणजे गाण्यातील कलाकार हे स्वतः स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत. या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण झालेले असून हे गाणं येणाऱ्या 20 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता एबीसी फिल्म या युट्युब चॕनलवर प्रदर्शित होणार आहे.
या गाण्याचे निर्माते बँगलोर येथिल उज्ज्वल भाकरे, दिग्दर्शक कृणाल कांबळे, म्युझिक कम्पोझर चेतन ठाकूर, गायक यशराज यावले, भुषण जोंधळे आणि वैष्णवी शुक्ला असून गाणं आशिष भाकरे सर यांनी लिहीलेलं आहे.
सध्या महाराष्ट्रातील पुण्यासहित अनेक शहरांमध्ये गाण्याचे जोरदार प्रमोशन सुरू असून विद्यार्थी आणि प्रेक्षकांमध्ये बराच उत्साह आणि आतुरता दिसून येत आहे. 20 फेब्रुवारीनंतर हे गाणं ‘एमपीएससी अँथेम साँग’ असे सर्च केल्यास आपण पाहू शकाल अशी माहिती गाण्याचे प्राॕडक्शन हेड आणि अभिनेते ॲड. सुरज जामठे यांनी दिली.