पिंपरी-चिंचवड | ऑनलाईन मुलींचे फोटो पाठवुन वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; वेश्याव्यवसायातून 3 मुलींची सुटका ; सामाजिक सुरक्षा विभाग पथकाची कामगिरी

पिंपरी चिंचवड वार्ता :- सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने ऑनलाईन मुलींचे फोटो पाठवुन वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश, ०३ पिडीत महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका

मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालगाव्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक १८/०२/२०२२ रोजी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल कामिनी येथे ऑनलाईन मुलींचे फोटो पाठवुन हॉटेल बुक करून सैक्स रॅकेट चालविणाऱ्या तीन इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पहा चालवायचा कारवाईचा व्हिडिओ

दिनांक १८/०२/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंगलदार यांनी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत अहिंसा चौक ते एसकेएफ कंपनीकडे जाणारे रोड वरील हॉटेल कामिनी येथे एक इसम जॅक हे नाव चापरून त्याचे मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअॅप वरून वेगवेगळ्या मुलीचे फोटो गि-हाईकांना पाठवुन वैश्याव्यवसायाठी मुलीची निवड करण्यास सांगतो.

पहा व्हिडिओ

त्यानंतर गि-हाईकाने वेश्यागमनासाठी मुलीची निवड केल्यास वेगवेगळ्या हॉटेलवर गि-हाईकांना बोलावुन तेथे मुलींच्या नावावर हॉटेलमध्ये रुम बुक करून वेश्यागमनासाठी गि-हाईकांना येण्यास सांगुन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतो. अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल कामिनी येथे डिकॉय कस्टमर पाठवून वेश्या व्यवसाय चालतो याची खात्री होताच सायंकाळी ०५:४० वाजता सापळा रचुन छापा टाकुन ०२ दिल्ली येथील ०१ छत्तीसगड राज्यातील अशा एकूण ०३ पिडीत महिलांची वेश्याव्यवसायातून सुखरुप सुटका केली आणि घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

१) ४६००/- रु रोख रक्कम २) २०/-रु.कि वे इतर साहित्य.एकुण ४,६२०/- रु.किं.चा मुद्देमाल मिळून आला म्हणून पाहिजे आरोपी नामे १) जॅक (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) २) बबलु नावाचा इसम (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) ३) करण (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांचेविरुध्द चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुरनं ०१/२०२२ भा.दं.वि. कलम ३००(३) ३४ सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चिंचवड पोलीस स्टेशन करीत आहे.

सदस्थी कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. काकासाहेब डोळे मा. सहा. पोलीस आयुक्त डॉ. श्री. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, सपोनि डॉ. अशोक डोंगरे, पोउपनि श्री. प्रदिपसिंग सिसोदे, पोउनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अमोल साडेकर, जालिंदर गारे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, अमोल शिंदे, सुमित डगाळ यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!