अकोला: प्रतिनिधी प्रेमकुमार गवई
अकोला वार्ता :- मुर्तिजापूर येथून जवळच असलेल्या लाईत गावामध्ये जि. प.शाळा लाईत आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने छ.शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्राम शिक्षण केंद्र स्थापन केले.मुलांना वाचनाची सवय लागावी व मुलांच्या शिक्षणात गावकऱ्यांचा सहभाग वाढावा व मुलांच्या शिक्षणावर चर्चा होऊन गावात शैक्षणिक वातावरण तयार व्हावे व बाहेर गावी जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना गावातच पुस्तके उपलब्ध व्हावी,जेष्ठ नागरिकांना सुद्धा इथे पुस्तके उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्राम शिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले.या करिता पुस्तके गावातूनच उपलब्ध झाली आहे.
