दर्यापूर – महेश बुंदे
शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळया फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र नजीकच्या कोकर्डा येथील सर्वोदय हायस्कूल कोकर्डा शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खंडूच्या सहाय्याने लक्षवेधक चित्रे रेखाटतात. अनिरुध्द राऊत असे या शिक्षकाचे नाव आहे. मेहनत आणि कल्पकतेच्या सहाय्याने शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त त्यांनी रेखाटलेले चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
