बातमी संकलन – महेश बुंदे
अमरावती वार्ता :- भारतीय रयतेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले शिवाजी महाराजांनी दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करून त्यांचा सर्व सारा माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्त्रियांचा आदर होता व सन्मान करत असतं.अशाप्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर ते एक स्वतंत्र सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.आराधना वैद्य म्हणाल्या. भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय, अमरावती राष्ट्रीय सेवा योजना द्वारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, प्रमुख वक्ते डाॅ. प्रशांत विघे कार्यक्रम अधिकारी प्रमूख उपस्थिती प्रा. स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. पल्लवी सिंग व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत विघे म्हणाले की, १९ फेब्रुवारी १६३० हा सोन्याचा दिवस मानला जातो,अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी, लोककल्याणकारी राजे, शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय.त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते. या कर्तुत्वान शिवाजी महाराजांनी आपल्या चतुर आणि चाणश्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला त्यांनी हरवून टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट संपूर्ण स्वराज्याची स्थापना ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यामूळे जुलमी शासन कर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या, गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नाव रूपाला आले असे प्रतिपादन केले.
