चाकण | कडाचीवाडी जवळ ट्रकच्या धडकेने दोन मुले जागीच ठार

प्रतिनिधी कुणाल शिंदे

चाकण वार्ता :- कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या अवजड वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील चाकण मधील कडाचीवाडी हद्दीत घडली आहे.यामध्ये तन्मय पंकज हरगुडे (वय- 18 )रा.साबळेवाडी, ता. खेड) व ओंकार कैलास साबळे (वय- 18 रा. बहुळ ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. या घटनेमुळे साबळेवाडी व बहुळ परिसरात शोककळा पसरली आहे.

हा अपघात चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील चाकण मधील कडाचीवाडी हद्दीत दुपारी तीनच्या सुमारास झाला. तन्मय व ओंकार कॉलेजमधून आपल्या पल्सर कंपनीची दुचाकी गाडी नंबर MH -12 QH1717 ने घरी जात होते. चाकण-शिक्रापूर रोड कडाचीवाडी हद्दीत पानचाळ बंगल्याच्या समोरील रोडवर पाठिमागून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH-12 MV 7097 ह्या ट्रक वाहनाची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तन्मय व ओंकार ह्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

आयशर ट्रक चालक आरोपी राजू विठ्ठल जाधव (वय 45 वर्ष रा.मुंगळा ता.मालेगाव जि.वाशिम )याचे विरुद्ध कायदेशीर फिर्यादी सोमनाथ भास्कर गायधने (चाकण) ह्यांनी दिलेल्या फिर्याद नुसार चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा भादवी कलम 304 (अ). 279, 337,338,427, मो. वा. का. कलम 184,177 नुसार नमूद आरोपी राजू विठ्ठल जाधव वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन पो.उपनिरी चव्हाण हे करीत आहे.

तन्मय याच्या पाठीमागे आजी-आजोबा, आई वडील, भाऊ, चुलते असा परिवार आहे.बहुळ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी चेअरमन पंकजबाप्पू हरगुडे यांचे ते चिरंजीव होते.तर ओकांर हा सामाजिक कार्यकर्ते कैलास बाजीराव साबळे यांचा मुलगा होता.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!