Post Views: 734
ठाणे वार्ता:- डोंबिवली जवळील दावडी गावात , डोंबवली पूर्व येथील ओम रेसिडेन्सी , फ्लॅट नं . B003 ,मंगळवारी दि 15 /2/2022 रोजी एका महिलेची तिच्या राहत्या घरातच हत्या करून तिचा मृतदेह घरातील सोफ्यात लपवून ठेवला असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे डोंबिवलीत खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तपास केला असता कुटुंबाच्या ओळखीतील २५ वर्षीय तरुणानेच सुप्रिया शिंदे यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
किशोर शिंदे, त्यांची पत्नी सुप्रिया आणि मुलगा हे कुटुंब दावडी येथील ओम रेसिडेन्सी संकुलात राहतात. सोमवारी सकाळी किशोर शिंदे हे कामावर गेले. दुपारच्या वेळेत मुलगा शाळेत गेला. त्यानंतर सुप्रिया घरात एकट्याच होत्या. किशोर यांचा मित्र विशाल भाऊ घावट हा नेहमी वाचनासाठी पुस्तके घेऊन शिंदे कुटुंबीयांच्या घरी येत होता. वाचलेली पुस्तके तो घेऊन जायचा आणि नवीन पुस्तके पुन्हा आणून द्यायचा. त्यांची कौटुंबिक ओळख होती.
सोमवारी सकाळी किशोर सुप्रिया शिंदे यांच्या घरी पुस्तके बदलण्याचे निमित्त करून आला. त्याने मुलगा शाळेत केव्हा जातो अशी विचारणा केली. मुलगा साडेबारा वाजता शाळेत जातो असे सुप्रिया शिंदे यांनी विशालला सांगितले. सोमवारी सकाळी मुलगा घरी असल्यामुळे विशालला काही करता आले नाही. त्यानंतर विशाल मंगळवारी दुपारी दीड वाजता सुप्रिया शिंदे यांच्या घरी पुस्तके बदलण्याची निमित्त करून आला. घरात कोणीच नाही हे पाहून विशालने सुप्रिया यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण सुप्रिया यांनी त्याला विरोध करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया यांनी दरवाजाजवळ ओरडा केला पण तो आवाज बाहेर आला नाही.
विशालने तितक्यात सुप्रिया यांना घरात ओढून त्यांचे डोके फरशीवर आपटले. नंतर पाडून जवळील टायच्या सुप्रिया यांची गळा दाबून हत्या केली. दिवसा मृतदेह कुठे नेणार असा प्रश्न निर्माण झाल्याने विशालने सुप्रिया यांच्या घरातीलच सोफ्यात त्यांचा मृतदेह ठेवला आणि पोबारा केला.
चपलेवरुन पोलिसांनी लावला शोध –
मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला होता, मात्र आरोपीचा सुगावा लागत नव्हता. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. दरम्यान तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर काही चपला आढळल्याचं पोलिसांना सांगितलं. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कोणाच्या होत्या याचा शोध सुरू केला. विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत नेमकी कोणती चप्पल होती हे निष्पन्न केलं आणि आरोपी विशाल घावटपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.
धक्कादायक म्हणजे सुप्रिया घरी नसल्याने किशोर हे मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले तेव्हा विशाल हादेखील त्यांच्यासोबत होता. काहीही सुगावा नसताना फक्त चपलेच्या आधारे आरोपी शोधण्यात मानपाडा पोलिसांना यश आले. असून आरोपी विशाल घावट यास मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.दरम्यान या इमारतीतील व आजूबाजूच्या कोणत्याही इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचं आवाहन केलं आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोनिरी अनिल पडवळ हे करीत असुन , नमुद गुन्हयात आरोपी नामे विशाल भाऊ घावट यास अटक करण्यात आलेली आहे . सदरचा गुन्हा हा श्री . दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, श्री. सचिन गुंजाळ, मा . पोलीस उप आयुक्त परीमंडळ ३ , कल्याण , श्री . जे . डी . मोरे , मा सहाय्यक पोलीस आयुक्त , डोंबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि श्री शेखर बागडे , पोनिरी , बाळासाहेब पवार , पोनिरी श्री . अनिल पडवळ , मसपोनिरी, मनिषा जोशी, सपोनिरी, अविनाश वनवे, सपोनिरी अनिल भिसे, पोउपनिरी सुनिल तारमळे, पोहवा / भानुदास काटकर, पोहवा / सोमनाथ टिकेकर, पोहवा / सुधीर कदम, पोना / प्रितम काळे, पोना / शांताराम कसबे , पोना / संजु मासाळ, पोशि / अशोक आहेर , पोशि / सोपान काकड, पोना / प्रशांत वानखेडे , पोना / अशोक कोकोडे, पोना / सुशांत तांबे, पोना / सुधाकर भोसले, पोना / गणेश मोरे , पोना / शरीफ तडवी, पोशि / तारांचंद सोनवने, पोशि / चंद्रकांत सोनवने यांचे पथकाने उघडकीस आणलेला आहे.