दर्यापूर नं. ३ सेवा सहकारी संस्था र.नं. ३५६ च्या अध्यक्षपदी किशोर गणोरकर तर उपाध्यक्षपदी अजित देशमुख यांची निवड

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर शहरातील दर्यापूर न. ३ सेवा सहकारी संस्था मर्या.र.नं. ३५६ ची पंचवार्षिक निवडणूक अविरोध संपन्न झाली होती. या दर्यापूर न. ३ सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी किशोर रामचंद्र गणोरकर यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अजित शिवकुमार देशमुख याची निवड करण्यात आली आहे. संचालक पदासाठी ही निवडणूक अविरोध झाली होती .

यामध्ये सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघात किशोर रामचंद्र गणोरकर, सखारामपंत श्रीराम देशपांडे, रमेश महादेव चौधरी, किरण मार्तंडराव मोकासदार, राम नारायण काळबांडे, नंदकिशोर गोपालसिंह बयस, विजय उद्धव इंगळे निवडून आले तर अनुसूचित जाती व जमाती मतदार संघात दीपक मारोती मालखेडे, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गात मारुती नामदेव एकादशे, इतर मागासवर्ग मतदारसंघात श्रीराम दिनकर कुटाफळे, महिला राखीव मतदारसंघात रेखा उमेश ताडे व कमला रामदास बन्सी हे संचालक म्हणून अविरोध निवडून आले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे सर्व संचालक यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!