प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि१९(वार्ताहर) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोई येथील शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद अर्जुन गवारे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्या व खाऊ वाटप करून चिखली येथील अनाथ आश्रामातील मुलांना अन्नदान देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आनंद गवारे व नेत्राताई गवारे यांच्या हस्ते करण्यात आले .
