चिखली | गॅस रिफिलींग करून गॅसची चोरी करणाऱ्या इसमांविरुध्द सामाजिक सुरक्षा विभाग पथकाची कारवाई

पिंपरी चिंचवड वार्ता:- मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक १७/०२/२०२२ रोजी चिखली पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गैस रिफिलीग करून गॅसची चोरी करणाऱ्या इसमावर कारवाई कारवाई करण्यात आली आहे.

पहा कारवाई व्हिडिओ

दिनांक १७/०२/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चिखली पोलीस स्टेशन हद्दीत गंगारामनगर, जाधववाडी, चिखली, पुणे येथील रिव्हर रेसीडन्सी ते रामकृष्ण हरी चौकाकडे जाणारे रोडलगत असलेल्या जय मल्हार गॅस या पत्र्याचे दुकानाचे पाठीमागील पत्र्याचे रुममध्ये इसम नामे इंद्रशेखर पंढारे हा गैससारख्या ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता धोकादायक पध्दतीने भारत गॅस एजन्सी व एचपी गैस एजन्सीच्या घरगुती गॅसचे टाकीतुन छोट्या गॅस टाकीमध्ये गैस रिफिलींग करून गॅसची चोरी करीत आहे. अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी चिखली पोलीस हद्दीत सापळा रचुन १२:०० वाजता छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

१) ७,०३०/- रुपये रोख रक्कम, २) १,७२,५४९/- रुपये किंमती चे गैस सिलेंडर २४ लहान व ६९ मोठ्या अशा एकुण ८५ टाक्या., ३) २,४००/- रु गैस चोरी करण्याचे साहित्य.,४) ४,५०,०००/- रु किं. ची दोन वाहने.

असा एकुण ६.३१,९७९/- रु कि चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन आरोपी नामे १) इंद्रशेखर हनुमंतराव मंढारे वय ३० वर्षे रा. पुणेरी स्विटमार्टजवळ, डुडुळगांव, मोशी, पुणे (गैस रिफिलींग करणारा मालक) २) लक्ष्मण मोहनराव म्हेत्रे वय २३ वर्षे रा. येणकी पो होनाली ता. उदगीर जि. लातूर (भारतगैस शहिद शंकर गैस एजन्सी चा कामगार/ चालक तीन चाकी गाड़ी क्रमांक एमएच १४ सी डी १०९) ३) साईनाथ मारुती शिरसेकर वय १९ वर्षे रा. भानुदास आल्हाट यांच्या मांड्याचे •रुममध्ये अरुणनगर, गोशी, पुणे (नागेश्वर एचपी गैस एजन्सी चा कामगार/चालक टेम्पो क्रमांक एमएच १४ डी. एम. ०४२५ ) यांचेकडे गॅस सिलेंडर टाक्या कोणाकडून आणल्या आहेत याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी १) भारत गॅस एजन्सी शहिद शंकर गॅस एजन्सी, संभाजीनगर, घरकुल चिखली, पुणे २) नागेश्वर एचपी गैस एजन्सी, मोशी, पुणे या गॅस एजन्सी मधुन गॅस सिलेंडर टाक्या आणल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

म्हणून त्यांचेविरुध्द चिखली पोलीस स्टेशन येथे गुरनं ७६ / २०२२ भादंवि कलम ३७९, ४२०, २८५ ३४ सह जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७ सह एलपीजी ( पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३,४,५.६.७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा अपर पोलीस आयुक्त श्री.डॉ.संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. श्री. प्रशांत अमृतकर, व.पोनि श्री. देवेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागातील सपोनि डॉ. अशोक डोंगरे,पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे,पोउपनि धैर्यशिल सोळंके,पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोढे, भगवता मुठे, अमोल साडेकर, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, योगेश तिडके, वैष्णवी गावडे, संगिता जाधव यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!