विवेक मोरे/ प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर:- तालुक्यातील शिरपूर येथील शेतकरी निवृत्ती पुसदकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये जखमी अवस्थेत असलेले नीलगायचे पिल्लू आढळून आले त्यानंतर पर्यावरणप्रेमी तेजस निवृत्ति पुसदकर यांनी विहिरीमध्ये उतरून निलगायीच्या पिल्याला सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले.

त्यानंतर त्यांनी पर्यावरण अभ्यासक ओम किशोर मोरे,श्रमिक मोरे, तेजस पुसदकर यांना कळवले व त्यानंतर प्रथम उपचार केले त्यानंतर त्यांनी रॅपिड रेस्क्यू युनिट, वन विभाग अमरावती यांच्याकडे सुखरूप देण्यात आले.
