Post Views: 620
आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप व महाप्रसाद
बातमी संकलन – महेश बुंदे
निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तसेच भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नागरवाडी येथे संत गाडगेबाबा यांच्या १४६ व्या जयंती महोत्सव शासनाच्या नियमांचे पालन करत साजरा होणार असल्याची माहीती संस्थेचे संचालक श्री. बापुसाहेब देशमुख यांनी दिली. प्रामुख्याने या महोत्सवाची सुरुवात आश्रमशाळेचे जेष्ठ शिक्षक श्री राऊतकर सर यांच्या शुभहस्ते तिर्थस्थापना व बाबांच्या मूर्तीचे महापूजन करण्यात आले.
जयंती महोत्सवाच्या दरम्यान काकड आरती, सामुदायिक प्रार्थना, भजन-कीर्तन-हरिनाम,स्वच्छता अभियान तसेच विविध सेवाभावी उपक्रम राबवत, येत्या २३ फेब्रुवारीला राज्यमंत्री ना. श्री. बच्चुभाऊ कडू यांचे शुभहस्ते भक्त निवास ईमारतीचे भूमीपुजन करण्यात येईल. दरम्यान ह.भ.प. श्री. अनंत महाराज कुंडकर ( मोतीराम महाराज यांचे चिरंजीव ) यांचे काल्याचे कीर्तन होईल.तद्नंतर परिसरातील गरजू आदिवासी बांधवांना मान्यवरांच्या शुभ्हस्ते वस्त्रदान करण्यात येईल. यानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. प्रामुख्याने परिसरातील भाविक भक्तांनी या जयंती महोत्सवाला उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गाडगेबाबा जन्मोत्सव समितीचे प्रमुख श्री. बापुसाहेब देशमुख यांनी केले आहे.