गायवाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा गाव भेट दौरा संपन्न…!

दर्यापूर – महेश बुंदे

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस करण ढेकळे यांच्या सुचनेनुसार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभरात संघटनात्मक बांधणीच्या निमित्ताने शहर व ग्रामीणमध्ये दौरे आखण्यात येत आहेत .

या अनुषंगाने दर्यापूर ग्रामीणमध्ये संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने गायवाडी जिल्हा परिषद सर्कल क्षेत्रातील आमला, नांदेड, शिंगणापूर, दारापूर, या प्रमुख गावांना भेटी देत जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, पंचायत समिती सर्कल प्रमुख, गाव प्रमुख, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या नियुक्त्या करून पक्ष संघटन मजबूत करत सोबतच सर्व सामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता यावेत व सर्व सामन्यांच्या हिताच्या विविध योजना राबविता याव्यात या दृष्टीने पक्ष संघटन अधिक महत्त्वाचे आहे, या निमित्त या दौऱ्याचे आयोजन केले होते.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे, जिल्हाउपाध्यक्ष विपीन शिंगणे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ग्रामीण नितिन गावंडे, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष शफन पटेल, राष्ट्रवादी वक्ता सेलचे तालुका अध्यक्ष मुकेश डाहेकर, शिंगणापूर पंचायत समिती प्रमुख श्रेयस ढवळे, तोसिफ पटे, मो वासिम मो इसा, बाला ठाकूर, मो अयाझ मो इस्राईल, अब्दुल मुकिम अब मझिद पटेल, अभिजित इसल, कुणाल इंदुर्क, निखिल पाठक, चेतन इंदूर्क, मो नईम मो इसा, शिंगणापूर येथील महेंद्र हरणे, नितीन पाटील, वैभव हरणे, प्रज्वल मावंदे, आदित्य हरणे, रितेश मालोकार, हर्षल धुमाळे, शाम पांडे, वैभव राऊत इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!