पुणे वार्ता :- चाकण शहरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले होते.त्यामुळे पिंपरी चिंचवड ट्रॅफिक आयुक्तालयाकडून दिनांक 14 फेब्रुवारी पासुन चाकणमध्ये एकेरी वाहतुकीला सुरवात करण्यात आली.
वाहनचालक ऐकत नसल्याने चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई साठी पोलीस पथक तैनात
त्याचे फलक देखील वाहतूक विभागाने जागोजागी लावण्यात आले. त्यामुळे चाकण येथील मेन चौकातील वाहतूक बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.ट्रॅफिक कोंडीतून काही प्रमाणात सुटका यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.परंतु अजूनही काही नागरिक उलट्या दिशेने वाहने चालवत असुन सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
पहा व्हिडिओ
त्यामुळे ट्रॅफिक पोलीस व नागरिकांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळत आहे.यावर ट्रॅफिक पोलीसांकडून काय कडक कारवाई होणार हेच पाहावे लागेल.