Post Views: 564
वाहतुकीस होतो त्रास, ग्रामपंचायतने जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करावा
दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील तोंगलाबाद येथे असणारा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला आहे. या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा ठरत आहे. गावातील सर्वच रस्ते पक्के सिमेंटकाँक्रीटचे आहेत, पण हा गावचा मुख्य रस्ता नादुरुस्त असल्याने आदर्श गावाची प्रतिमा मलिन होत आहे.
याच आठवड्यात गावात ग्रामदैवत संत हनुमान महाराज याचा यात्रा महोत्सव संपन्न झाला,यावेळी या रस्त्याची दुरवस्था अनेकांच्या निदर्शनास आली. यावेळी नालीचे सांडपाणी सुद्धा रस्त्यावर आले असल्याचे चित्र पहायला मिळाले.तरी ग्रामपंचायतने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सदर मुख्य रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने आणि पुढील दोन महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने या मुख्य रस्त्याच्या विकासाचे ग्रहण आता तरी सुटणार का? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. ग्रामपंचायतने जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.