भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ यांच्या वतीने रोजगाराच्या प्रश्नासाठी देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून नांदगाव खंडेश्वर शहरापासुन २ कमी अंतर कंझरा रोड स्थित एमआयडीसी नियोजीत जगिवरील बोर्डावर चढून आंदोलन केले.
आंदोलन व्हिडिओ
बेरोजगारीत तीव्र वाढ होताना दिसत आहे. अत्यंत मर्यादित जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज भरले जातात . नोकर भरती ऐवजी देशांमध्ये राज्यामध्ये सुद्धा नोकरीसाठी दंगली होत आहे. शहरी रोजगार योजना सुरू करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण रोजगार हमी योजना मर्यादित करून ठेवली आहे.रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी क्षेत्रातील भरतीवरील बंदी उठवा, सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त असलेली 60 लाख पदे त्वरित भरा, आतापर्यंत घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी, शासकीय विभागातील भरतीसाठी होणारी प्रक्रिया खाजगी एजन्सी आऊटसोर्सिंग बंद करावे. नोंदणीकृत बेरोजगारांना रुपये 5000 चा बेरोजगार भत्ता द्या. तरुणांना एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे नाव नोंदणी करण्यासाठी परवानगी द्यावी. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कांजरा रोडवरील मिनी एमआयडीसीचे काम युद्धपातळीवर सुरू करावेत असे स्थानिक उद्योजकांना भाडेतत्त्वावर भूखंड द्यावा या आशयाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांना पाठविण्यात आले.
पहा आंदोलक प्रतिक्रिया व्हिडिओ
यावेळी जिल्हा सचिव किशोर शिंदे, उपाध्यक्ष अंकेश खंडारे, अब्दुल मोसिन, राजिक, कांतेशवर पुंड , दिनेश बावणे, सुरज नेमाडे, प्रतीक शिरसाट, राम शिंदे, प्रणय सोनोने, शहेनशहा यांचेसह असे खायचे जिल्हा सचिव विशाल शिंदे उपस्थित होते