धक्कादायक…! घरातल्या सोफासेट मध्ये आढळला महिलेचा मृतदेह ; डोंबिवली मधील घटना

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली वार्ता : डोंबिवली नजीक असलेल्या दावडी परिसरात एक धक्कादायक घडली आहे. एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह तिच्याच घरातील सोफा सेटमध्ये कोंबून ठेवण्यात आला.सुप्रियाचा पती कामावर गेला होता तर मुलगा शाळेत गेला होता. दुपारी 12.30 ते संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान हत्येचा प्रकार घडला असून पती किशोर याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्हयाच्या तपासकामी पोलिसांची तीन ते चार पथके गठीत केली आहेत.

गळा दाबून या महिलेला मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, तिच्याच घरात हत्या करून तेथील सोफा सेटमध्ये मृतदेह कोंबण्याचा धक्कादायक प्रकार कोणी केला? ही बाब शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखक करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सुप्रिया किशोर शिंदे वय33 वर्ष अस हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी बिल्डींगमध्ये बी विंगमध्ये राहणारे शिंदे कुटुंब , किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी साडे बारा वाजता शाळेत गेला होता. सुप्रियाची तब्येत बरी नसल्याने शेजारी राहणा-या महिलेला तीने मुलाला शाळेत सोडण्यास सांगितले. संध्याकाळी साडेपाचला मुलगा शाळेतून घरी आला तर दार ठोकूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही.

सुप्रिया ही घरात एकटीच होती. तिचा मुलगाही शाळेत गेला होता. सुप्रिया ही शाळेत आपल्या मुलाला घ्यायला गेली नसल्यानं फोनाफोनी सुरु झाली. शेजाऱ्यांकडे ठेवण्यात आलेल्या चावीनं दरवाजा उघडण्यात आला. मात्र, सुप्रिया आढळून आली नाही. दरम्यान तिचे पती किशोर शिंदे हे सुद्धा संध्याकाळी उशिरा घरी पोहचले. मात्र, पत्नीचा काही ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, शिंदे यांच्या घरात नातेवाईक आणि शेजारी जमले . त्यांना सोफा सेटमध्ये काहीतरी संशयास्पद वाटले. सोफ्याची तपासणी केली असता यात सुप्रियाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली. सध्या काही लोकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं समजतं आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र सुप्रिया यांचा कोणी व कशासाठी खून केला ? त्यांच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे का ? याचा तपास मानपाडा पोलीस करीत आहे.

मोबाईल गायब


सुप्रियाचा मोबाईल गायब झाला असून तीच्या हरविलेल्या मोबाईचा पोलिसांनी सीडीआर रिपोर्ट मागविला आहे. प्लास्टिकच्या दोन मोठया टॅगने तीचा गळा आवळण्यात आला आहे. डोक्यावर तीच्या गंभीर जखम आहे. प्रहार केल्यावर जमिनीवर उडालेले रक्त ज्या कापडयाने साफ केले ते कापड घराच्या माळयावर सापडले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!